येळकोट येळकोट जय मल्हार

              खंडोबाचे कडेपठार
               १ जानेवारी २०२०
                 
      ता : पुरंदर 
      जि : पुणे 
      मार्ग : पुणे-कात्रज-खडी मशीन चौक-येवले   वाडी-बोपदेव घाट मार्गे-सासवड-जेजुरी कडे पठार.

      २०१९ साल माझ्या साठी खुप छान गेले.गत वर्षात अनेक गड , ट्रेक मी यशस्वीपणे पार केले.
       २०२० ची सुरुवात आज खंडेरायाचे दर्शन घेऊन झाली.
     पहाटे ५.१५ वाजता कात्रज येथुन  चार चाकी वाहनाने डॉ.अजय इंगळे , धनवडे साहेब व मी सुशिल दुधाणे 

 प्रवासास सुरुवात केली. बापदेव घाट मार्गे सासवड वरुन पुढे जेजुरी च्या अलीकडे कडेपठार अशी नगरपालीकेने कमान उभारली आहे.तेथे ३० रु.नगर पालिकेची रीतसर पावती घेऊन पुढे निघालो.गाडी पार्क करून चालण्यास सुरुवात केली.

सुरुवातीपासून च पायऱ्यांचा मार्ग सुरू झाला.


मी जवळपास १५ ते २० वर्षांपूर्वी येथे आलो होतो.आज पुन्हा योग आला येथे येण्याचा.थंडी चे दिवस असल्याने आज वातावरण खुप छान होते.निसर्गाची मुक्त उधळण येथे पाहायला मिळाली.सूर्य देवतेचे दर्शन भल्या पहाटे डोंगर माथ्यावर भटकंती करत असताना होणे म्हणजे परम भाग्य.

पायरी मार्ग पदभ्रमण करून आम्ही अर्ध्या तासात खंडेरायाच्या मंदिरात पोहचलो,


 मनोभावे दर्शन घेतले.मंदिर पद्ष्रिणा पूर्ण करून , आजूबाजूचा परिसर फिरलो.खूपच निसर्गाने भरलेले वातावरण असल्याने आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य होते.देव दर्शन करून आम्ही पायरी मार्गाने आल्या वाटेने परत निघालो.जवळपास येऊन-जाऊन दीड तास व पावणे चार किलोमिटर व ९१४ मी.( ३००० फुट) ची चढाई-उतराई करून कडेपठार ची भटकंती पूर्ण केली.
    तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाचे मूळ ठिकाण असणाऱ्या कडेपठार मंदिरात गणपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
श्रीभगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा... यादिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडाऱ्याने पूजा केली. तेव्हापासून हा शुभ दिवस 'गणपूजा' या नावाने ओळखला जातो. आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 

‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं... हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येईल.
या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. तरी, जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही. भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर म्हणूनच ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कुणी दिवटी-बुधली घेऊन देवाला ओवाळण्यासाठी आलेले असतात, तर कोणी वाघ्या-मुरळींकडून ‘जागरण-गोंधळ’ घालण्यासाठी. जेजुरी आणि कडेपठारावर दिसणारी दृश्यं नेहमीची. त्यातही, सणासुदीला, चंपाषष्ठी अथवा सोमवती अमावस्येला जेजुरीला होणाऱ्या लाखोंच्या गर्दीपेक्षा कडेपठारावरील देवाच्या आद्यस्थानी तुलनेनं निवांत दर्शन होत असल्याने तेथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत जेजुरगडाच्या मागच्या बाजूने अवघड डोंगरवाटा पार करत कडेपठारावर जाण्याचा मार्ग होता. आता देवस्थान समितीने पायऱ्यांचा अधिक सोपा आणि गडावर जलद घेऊन जाणारा मार्ग केला आहे.

 त्यामुळे, कडेपठारी येणाऱ्या भक्तांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

मणि आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता. सर्वसामान्यांसह ऋषी-मुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली. सर्व योगी-मुनींना वाचविण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला, अशी कथा. ‘मार्तंडभैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग घेतले अन् कडेपठारावर त्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव. तर, म्हाळसेचा कांत (नवरा) म्हणून म्हाळसाकांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी, अशी नावे प्रचलित आहेत.
     कडेपठार चे पठार हे ११.५ एकर आहे.


कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून, पायऱ्यांची चढण पार करून आपण कडेपठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो. जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान असले, तरी आकर्षक आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी, तर पुढे कासव आहे. 

जेजुरीप्रमाणे या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा, असे तीन भाग आहेत. गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे.

 बैठकीच्या डाव्या-उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी आयुधे. तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, 

खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंगं आहेत. 

त्याशिवाय, खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर