ट्रेक कोयणा रिव्हर ट्रेल

ट्रेक कोयना रिव्हर ट्रैल
मालदेव ,
ता.व जि. : सातारा.


        सह्यादी ट्रेकर्स फाउंडेशन संस्थेमार्फत २० ऑगस्ट २०१७ रोजी कोयणा रिव्हर हा  ट्रेक आयोजित केला होता.पहाटे ५.३०  वाजता भोंडवे ट्रॅव्हल्स च्या बसने  ८२ सदस्य  साताराच्या दिशेने मार्गस्थ झाले. आदल्या दिवसाच्या  रात्री पासूनच पाऊस चांगलाच बरसत होता.त्यामुळे  आज सुद्धा वरून राजाने आमच्यावर कृपा केली होती. सातारा येथे भवरलाल राजपुरोहित यांनी सर्वांच्या नाश्त्याची  व्यवस्था केली होती. उपिट, जिलेबी व चहा यावर सर्वानी ताव मारला, व नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात  केली.सकाळी ८.३०  वाजता आम्ही,

 मालदेव या गावी पोहचलो.


या येथूनच  ट्रेक ला सुरुवात केली.


पावसाचा जोर चांगला च होता,त्यामुळे वाट अतिशय निसरडी झाली होती.

चालताना खुपच  त्रास होत होता. आज आम्ही वाटाड़या न घेता  ट्रेक करण्याचे ठरविले होते. साधारणता दिड तासांच्या  व ३.५०  किलोमीटर अंतर पार केल्यानंतर लक्षात आले की आपण वाट चुकलो आहे. त्यानंतर  माघारी फिरण्याची वेळ आली. गावातील स्थनिक वाटाड़या ला  सोबतीला घेतला व परत पदभ्रमण चालु केले. तासाभराचे  अंतर पार केल्यावर येथे आम्हाला वाघेडचा सडा लागला.या ठिकाणी  खूप मोठे पठार नजरेस पडले.या ठिकाणची वाट ही संपूर्ण  कातळातील  होती.  वाट खुपच निसरडी झाल्याने , बरेच जण या वाटेवरिल असलेल्या चिखलातून चालताना  घसरून पडत होते. धुके हि जास्त प्रमाणात झाले होते.

धुके जास्त असल्याने सर्व  सदस्य  एका रांगेतच चालत होते,


 कारण धुक्यात वाट चुकण्याची दाट शक्यता असते. पठार खुपच लांबवर विखुरले  होते,त्यामूळे पठाराची वाट संपता संपत नव्हती.

त्यात पावसाचा जोर तर वाढतच होता, खाली बघून जावे लागत होते. नजर थोडी जरी हटली तरी घसरून पडण्याची दाट शक्यता  होती. त्यामुळे प्रत्येक पाउल जपून टाकावे लागत होते, त्यातच या  भागात  जळवा ही  खूप होत्या.

काही सदस्यांना या जळवा लागल्या.

 त्याची ही खबरदारी घ्यावी लागत होती, आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी दयनीय झाली होती. प्रत्येक जण मुंडी खाली बघून च चालत होता, खाली मुंडी नि पाताळ धुंदी .जवळपास ६  किलो मीटर चे विस्तीर्ण पठार पार करून, पावसाचा जोर जास्त असल्याने  आम्ही तेथेच बुफे लंच घेतला. हे पठार म्हणजे कास पठाराची प्रतिकृती म्हणावी लागेल. दूरवर फक्त पठार दिसत होते, सोप्या भाषेत सांगायचे तर अगदी टेबल लँड जागा च म्हणा हवं तर.पठार पार करुन आम्ही  जरकवाडी चा सडा येथे पोहचलो.येथून पुढे  मजल दर मजल करीत झुमटी या गावी पोहचलो. या  येथेच ट्रेक पूर्ण करण्याचा निर्यय घेतला.दोन्ही बस च्या चालकांना  गाडी घेउन येथेच  बोलवन्यात आले. आमच्यातील काही दहा-बारा  सदस्यांनी बसची वाट न पाहता कास या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला, व पुढे मार्गस्थ झाले.या येथून पुढची वाट ही संपुर्ण डांबरी रस्त्याची सुरु झाली. 

जवळपास ७  किलोमीटर ची डांबरीकरन असलेली  वाट चालून आम्ही कास येथे  पोहचलो.


          आजचा संपूर्ण ट्रेक  आमचा २० ते २१  किलोमिटर व सात ते साडेसात तासांचा  झाला.


   

      आजचा ट्रेक नवीनच होता, प्रत्येक ट्रेकर्स ने हा ट्रेक अवश्य करावा, पावसाळ्यात शक्यतो करू नये, कारण या दिवसात वाट खूप निसरडी असते, घसरून पडण्याची  दाट शक्यता असते.

    ट्रेकची सांगता झाल्यावर लगेचच  जेवणाची तय्यारी चालू झाली. 

आमच्या संस्थेचे  नेहमीचे आचारी आप्पा जगताप,बुटाला,गणेश आगाशे,मनीष मोटा,भगवान चवले,व आमचे ग्रुप लीडर सुरेंद्र भाऊ दुगड व त्यांना मोलाची व बहुमोल मदत करणारा राजू टिळेकर,व अमोल जोशी (सातारा)  यांनी सर्व जबाबदारी योग्य पार पा पाडली,सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन नंतर पुण्याकडे प्रस्थान केले.



       वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.




Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर