कोरठण खंडोबा मंदिर
कोरठण खंडोबा मंदिर
२३ फेब्रुवारी २०२०
ता : पारनेर
जि : अहमदनगर
गाव : पिंपळगावरोठा
मार्ग :पूणे -वाघोली-लोणीकंद -शीक्रापुर-रांजणगाव -मळठण -टाकळी हाजी निघोज-अळकुटी-पिंपळगावरोठा.
अंतर : पुण्यापासून १२४ किलोमीटर.
अळकुटी सरदार कदम बांडे वाड्या पासून ९ किलोमीटर.
पिंपळगाव रोठा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच पठारावर वसले आहे.
येथील मध्ययुगीन कोरठण खंडोबा मंदिर अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
कोरठण खंडोबाचे मंदिर मध्ययुगात बांधले गेले. मंदिराच्या प्रवेशद्वारापासच्या शिलालेखानुसार याचे बांधकाम शा.श. १४९१ (इ.स. १५६९च्या सुमारास) साली पूर्ण झाले. इ.स. १९९७ मध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर (मार्गशीर्ष, शा.श. १९१९) गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला.
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेले कोरठण खंडोबा मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. एकेकाळी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण; पण सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतींवर बंदी घातल्यानंतर त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारेही हे गाव ठरले. घडीव मूर्ती नसल्याने दररोज देवाचे नवे रूप येथे पहायला मिळते. जुन्या अनिष्ट प्रथा बंद करून नव्या पद्धती स्वीकारणारे गाव म्हणून याकडे पाहावे लागेल. बाजारू स्वरूप न देता देवस्थानचा सुनियोजित विकास करून जुन्या-नव्याचा संगम साधणारे हे ठाणे तसे निराळेच म्हणावे लागले.
मंदिराजवळ सापडलेल्या शिलालेखानुसार
१४९१मध्ये त्याचे बांधकाम झाल्याचे आढळून येते. 'बिन टाक्याचा देव' म्हणून याला पूर्वी देवाचे 'कोरं ठाणं' आहे, असे म्हणत.
त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्धीला आले.
स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचे दर्शन होते.
पुढे स्वयंभू बारा लिंगे आहेत. 'बिन टाक्याचा देव' हे येथील वैशिष्ट्य. त्यामुळे मूर्तीला दररोज स्थानानंतर वस्त्रे, अलंकार चढविले जातात.
स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिटकविले जातात. त्यामुळे देवाची मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पहायला मिळते. पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती चित्ताकर्षक बनते. आपल्याकडे अनादी काळापासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये खंडोबा देवाला कुलदैवत मानले जाते.
भगवान शंकराने मनी आणि मल्ल या दोघाचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाच अवतार धारण केला, तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी होता. खंडोबा अवतार दिवस म्हणूनही चंपाषष्ठीला महत्त्व आहे. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले
हा दिवसही खंडोबाचे ठाणे असलेल्या ठिकाणी महत्त्वाचा. हे सर्व उत्सव कोरठणलाही होतात. समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचाही प्रयत्य देते. माळशेजपासून ७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. माळशेजसारखेच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात या भागात पाहायला मिळते. जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी हे एक आहे.













Comments
Post a Comment